100%लसीकरण करणे…हाचआमचा सण… डॉक्टर चंद्रकांत बारेला… 

0
72

हेमकांत गायकवाड

चोपडा: श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा संचलित संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे तेली समाजाच्या विविध संस्थांच्या माध्यमातून नगरपरिषद चोपडाच्या हॉस्पिटल मार्फत दिनांक 12 ऑक्टोबर 2021 रोजी कोविंड लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला. लसीकरणाच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन , चोपडा नगरपालिकेच्या आरोग्य सभापती सौ सुप्रियाताई कांतीलाल सनेर यांचे हस्ते करण्यात आले. प्रा. सौ. सुप्रियाताई सनेर, चोपडा नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत बारेला, प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री के. डी. चौधरी, चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष टी. एम. चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉक्टर चंद्रकांत बारेला होते. कार्यक्रमाचे उद्घाटक सौ सुप्रियाताई सनेर यांनी नगर पालिके मार्फत लसीकरणा संबंधी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. नागरिकांनी या लसीकरणाचा फायदा घ्यावा व इतरांनाही लसीकरणासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन केले .यावेळी तेली समाजामार्फत विविध सेवा होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी लसीकरणाचे आव्हान करत असताना स्पष्ट केले की, लस घेतल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढणार आहे. भविष्यात तिसरी लाट आल्यास आपणास कोणताही धोका पोहोचणार नाही .त्यासाठी प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन केले. जोपर्यंत चोपडा तालुका 100% लसीकरण होत नाही तोपर्यंत आम्हा डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना चैन नाही. चोपडा तालुका 100% लसीकरण करणे हाच आमचा सण आहे ,असे अत्यंत जबाबदारी दाखवणारे विधान त्यांनी व्यक्त केले. त्यावेळी तेली समाजाच्या कार्याची तोंडभरून स्तुती केली. सुरुवातील संस्थेचे उपाध्यक्ष टी .एम. चौधरी यांनी प्रास्ताविक केले .यात त्यांनी डॉक्टर चंद्रकांत बारेला व आरोग्य सभापती सौ सुप्रियाताई सनेर यांच्या कार्याचा गौरव केला .संस्थेचे अध्यक्ष के .डी. चौधरी, उपाध्यक्ष टी. एम .चौधरी, महिला उपाध्यक्ष योगिता चौधरी, महिला कार्यकर्त्या विद्याताई चौधरी ,तालुकाध्यक्ष प्रशांत चौधरी, प्रदीप चौधरी ,गोपीचंद चौधरी, देवकांत के चौधरी, नारायण चौधरी , पितांबर चौधरी आदींच्या शुभहस्ते, कार्यक्रमाचे उद्घाटक सौ सुप्रियाताई सनेर, कोविल काळात रुग्णांची उत्तम सेवा केली याबद्दल डॉक्टर चंद्रकांत बारेला, असिस्टंट जगदीश बाविस्कर, परिचारिका मनिषाताई बारेला, रेखाताई ओतारी ,आशा वर्कर श्रीमती मंगला निकुंबेआदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रशांत चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Spread the love