लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणांनी 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल गोगावले यांना केला होता, यावेळी ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळात घेतला जाईल.
2100 रुपये देत असताना महिलांचे नवीन सर्व्हे केले जातील असं वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. यामध्ये कोणाकडे किती वाहणे आणि इतर वाहणे आहेत, या त्रुटी देखील तपासल्या जाणार आहेत. मात्र, या त्रुटी तपासात असताना 1500 रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊ. सुरुवातीला हे पैसै देताना आमची घाई गडबड झाल्याचे गोगावले म्हणाले.
लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये महिलांना कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण, महायुतीने निवडणुकीच्या काळात महिलांना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा झाले नाहीत. याबाबबत बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, 2100 रुपये देत असताना महिलांचे नवीन सर्व्हे केले जातील. यामध्ये कोणाकडे किती वाहणे आणि इतर वाहणे आहेत, या त्रुटी देखील तपासल्या जाणार आहेत. मात्र, या त्रुटी तपासात असताना 1500 रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार असल्याचे गोगावले म्हणाले.