२५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी जळगावात

0
37

जळगाव – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत २५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत लखपती दिदी प्रशिक्षण व मेळावा जळगावात होणार आहे.

त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निर्देश प्राप्त झालेले असून राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये जीवनोन्नती अभियान राबवण्यात येत आहे.

त्याअंतर्गत स्वयंसहाय्यता गट, ग्रामसंघ, प्रभाग संघांचे पदाधिकारी, समुदाय संसाधन व्यक्तींना सक्षम करण्यासाठी त्यांची क्षमता बांधणी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानूसार जळगावच्या कार्यक्रमासाठी नियोजन करण्याचे पत्र अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश जयवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Spread the love