प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील वांजोळा येथे सालाबादप्रमाणे यंदाही दि.२५ रोजी श्री मरी मातेच्या यात्रे निमित्त बारा गाड्या आयोजन करण्यात आले असून भगत मोहन रामा मोरे हे ओढणार असून मुकेश व गोपाळ मोरे हे बगले राहणार आहेत.मागील वर्षी भगत सिताराम मोरे यांनी बारा गाड्या ओढल्या होत्या.यात्रे निमित्त मिठाई , खेळणी, पाळणे व सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी येणार आहेत. रात्री भिमा नामा लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ वाल्मिक सोनवणे ,संजय भोई , जगदीश भोई ,व होमगार्ड चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.यात्रा शांततेत पार पाडावी व यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन पोलीस पाटील संतोष कोळी , सरपंच मंगलाबाई कोळी , उपसरपंच देविदास सावळे , अन्नपूर्णा जगदिश दोडे , इंदूबाई समाधान मोरे ,संजय तायडे , विक्रम मोरे , सामाजिक कार्यकर्ते हरीष पाटील , जगदिश दोडे, भागवत मोरे , मुकुंदा सावळे ,पत्रकार किशोर सावळे व ग्रामपंचायत व विकास सोसायटी सदस्य यांनी केले आहे.







