पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्यांच्या नावावर आणखी एक नवा विक्रम करणार आहेत. सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे मोदी हे दुसरे नेते बनणार आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात 4 हजार 78 दिवस पूर्ण केले आहेत.
हा कालावधी पूर्ण करतानाच त्यांनी देशाच्य माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही मागे टाकलं आहे.
शुक्रवारी नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना मागे टाकून सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनतील. अधिकाऱ्यांच्यां सांगण्यानुसार, आज अर्थात शुक्रवारी पंतप्रधान मोदी हे त्यांच्या ऑफीसमध्ये 4 हजार 078 दिवस पूर्ण करतील. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून 4 हजार 077 दिवस पूर्ण केले होते. 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 सालापर्यंत त्या सलग 4,077 दिवस पंतप्रधान होत्या.
तर देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तीन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला विजय मिळवून दिला. सलग तीन वेळा त्यांच्या पक्षाला विजय मिळवून देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरूंनी 6 हजार 130 दिवस देशाची सेवा केली. ते 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 सालापर्यंत पंतप्रधान पदी कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ 16 वर्ष 9 महिने आणि 12 दिवस इतका होता. पण नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरींची बरोबरी केली आहे. त्यांनी देखील आपल्या पक्षाला (भाजप) लाोपाठ तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे.