पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा मास्टर स्ट्रोक !
धरणगाव – धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर असून येथिल बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आलेल्या ठिकाणी आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी भव्य दिव्य उपजिल्हा रूग्णालय उभारले जावे यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून पालकमंत्री एवढ्यावरच न थांबता सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामाच्या 40 कोटीच्याअंदाजपत्रकास व आराखड्यानां मान्यता मिळाली आहे. या उपजिल्हा रुग्णालयाचे मान्यतेसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा करून धरणगाव वासीयांची मागणी पूर्ण झाली असल्याने धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा कोट
धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने नुकतीच मंजुरी मिळाली होती. कालच उपजिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी रुपये 39 कोटी 46 लक्ष 75 हजार इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याने तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार व्यक्त करतो.
पालकमंत्री गुलाबराव पाटील
असे असेल उप जिल्हा रुग्णालय
सदर अंदाजपत्रकामध्ये इमारतीचे बांधकाम G+२ असून निवासस्थान (टाईप-1) G+3, निवासस्थान (टाईप-2) G+3. निवासस्थान (टाईप ३) G+7, निवासस्थान (टाईप-4) G+4 आहे. एकूण इमारतीचे क्षेत्रफळ 8023.85 चौ.मी. इतके आहे. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक, उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक व जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी प्रमाणित केले नुसार 50 खाटांचे उप जिल्हा रुग्णालय, येथील मुख्य रुपये 39 कोटी 46 लक्ष 75 हजार इतक्या रकमेच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
अश्या असतील सुविधा
बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरात होणाऱ्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतरुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसुतीग्रुह, शस्त्रक्रिया ग्रुह, शवविच्छेदन विभाग, वाहन सुविधा (रुग्णवाहिका), नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण (TB), न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र तपासणी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामंतर्गत आरोग्य सुविधा, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र, रक्त पुरवठा केंद्र द्वारे रुग्णांना उपचार केले जाणार आहेत.