खानदेशात लाचेखोर उदंड जाहले! पारोळ्यात BDO, दोन विस्तार अधिकाऱ्यांसह 5 जणांना अटक

0
44

जळगाव -: दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत केलेल्या विकासकामांची बिले अदा करण्यासाठी व दुसऱ्या गावात घेतलेल्या कामांचे कार्यादेश (वर्कऑर्डर) काढून देण्यासाठी एकूण बिलाच्या दोन टक्के दराने म्हणजे दोन लाख रुपयांची लाच मागितली, म्हणून पारोळा पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांसह दोन विस्तार अधिकारी व दोन वरिष्ठ लिपिकांसह एकूण पाच जणांना बुधवारी (ता. २३) अटक करण्यात आली.

गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६, रा. मानराज पार्क, जळगाव), विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८, रा. मुक्ताईनगर, जळगाव), विस्तार अधिकारी गणेश प्रभाकर पाटील (वय ५०, रा. मानसिंगकानगर, पाचोरा), वरिष्ठ लिपिक अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७, रा. मोंढाळे प्र.अ., ता. पारोळा) व सहायक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील (वय ३७, रा. गुलमोहर बाग, पारोळा) अशी संशयितांची नावे आहेत.

कंत्राटादरांनी दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत सावखेडा होळ (ता. पारोळा) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे सात लाख व सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांच्या खडीकरणाचे ६० लाखांचे तीन कामे, शासनाच्या ‘९०-१०’ या हेडखाली ३० लाखांची तीन, अशी एकूण ९० लाखांची सहा कामे घेतली होती.

त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशांचे बिल व सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांचे कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात गटविकास अधिकारी शिंदे यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली.

 

Spread the love