भुसावळ येथे ७३ लाखाचे ड्रग्स पदार्थ जप्त . तिघांना अटक!

0
37

प्रतिनिधी -जितेंद्र काटे

भुसावळ – येथील एका हाॅटेल मध्ये मेथाक्वालोन ड्रग्स पदार्थ जप्त करण्यात आले असून या ड्रग्स ची किंमत जवळपास ७३ लाख आहे. या प्रकरणी भुसावळ येथील तिघांना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेले भुसावळ येथील रहिवाशी असून काही महिन्यांपासून भुसावळ शहरात व परिसरात ड्रग्स विक्री होत असल्याचे चर्चिले जात आहे.

ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्यासह बाजार पेठ पोलीस स्टेशन चे पो नि गजानन पडघण तसेच पोऊनि मंगेश जाधव आणि पोलिस कर्मचारी प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी , विजय नेरकर, महेश चौधरी,यासीन पिंजारी, भूषण चौधरी, अमर आढाळे यांनी सापळा रचून ही कारवाई केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स पदार्थ सापडल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Spread the love