भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ८० अर्ज दाखल !

0
35

भुसावळ – भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ ची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ मार्च रोजी एकूण १८ जागांसाठी ८० उमेदवारवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत .यात व्यापारी मतदार संघात ८ अर्ज , हामाल मापाडी मतदार संघात ४ अर्ज , विविध कार्यकारी सोसायटी च्या सर्वसाधारण मतदार संघात २६ अर्ज , ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ १३ अर्ज , विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग साठी ६ अर्ज , विविध कार्यकारी सोसायटी इतर मागास वर्ग ६ अर्ज , विविध कार्यकारी सोसायटी महिला राखीव ८ अर्ज , ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती ४ अर्ज , ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक ५ अर्ज दाखल करण्यात आले आहे . आता दि ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अर्जाची छाननी होणार आहे.

Spread the love