जळगाव संदेश प्रतिनीधी अमीर पटेल
एस.टी.महामंडळाने कंत्राटी पध्दतीवर घेतलेल्या चालकांना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाल्याने आम्हाला पुन्हा कामावर घ्या या मागणीसाठी राज्यभरातून आलेले जवळपास ८०० कामगार उपोषणाला बसले आहेत.
एस.टी. महामंडळाच्या नैमत्तिक (परमनंट) आस्थापनावरील चालक व वाहक यांनी २८/१०/२०२१पासून त्यांच्या मागणीसाठी संप घोषित केला होता.
शासनाकडून बरेच प्रयत्न करून संप मिटला नाही.यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली.या कारणास्तव शासन व प्रशासन यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून ए.टी.मार्फत चालक कंत्राटी पध्दतीने घेण्याचा निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ ८०० कत्राटी कर्मचारी दिनांक१२/०१/२०२२ पासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नेमणूक करुन घेतले.कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची सोय व्हावी तसेच महामंडळाची आर्थिक व्यवस्था चांगली रहावी या उद्देशाने प्रामाणिकपणे काम चालू केले. कंत्राट पध्दतीने घेताना आमचे वेतन रक्कम रुपये २३०००/- प्रती महिना देणेचे निश्चित झाले होते.परंतु प्रत्यक्षात आमच्या हातात रक्कम रुपये १४००० ते रुपये १५००० प्रति महिना देत होते. तरीसुध्दा आम्ही आज ना उद्या महामंडळाच्या कायम सेवेत येऊ या उद्देशाने प्रामाणिकपणे कमी वेतनावर काम करीत राहीलो. आम्ही कंत्राट पध्दतीवर कामावर येताना आमच्या राहत्या ठिकाणापासून डेपोपर्यंत नियमित तिकीट आकारले जात असे हा सरळ-सरळ आमच्यावर अन्याय होता. याबाबत विचारणा केल्यास तुम्ही कंत्राट पध्दतीवर आहात, तिकीट घ्यावेच लागेल असे सांगण्यात येत असे.एस.टी. महामंडळात कर्मचाऱ्यांची कमतरता असतानासुध्दा आम्हां कंत्राटी पध्दतीच्या कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता दिनांक ३/०९/२०२२रोजी अचानकपणकामावरून काढून टाकण्यात आले. या कारणामुळे आमच्या ८०० कर्मचाऱ्यांवर घोर अन्याय झालेला आहे. आज आमच्यावर व आमच्या कुटुंबीयांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करुन आमचा उदरनिर्वाह करीत असताना अचानकपणे अशा प्रकारची शासन व प्रशासनाकडून वागणूक मिळणे ह्यापेक्षा वाईट काय आहे? आम्ही कोरोना परिस्थिती असताना आमच्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांची सोय व्हावी या उद्देशाने महामंडळात काम केले. परंतु आम्हांला अन्यायकारक वागणूक देऊन आम्हांस हाकलून दिले अशी भावना महामंडळात कर्मचाऱ्यांची कमतरता असताना नवीन कर्मचारी घेतेवेळी संकटकाळी ज्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाची सेवा केली अशा कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. जर खरच तुम्हांस सर्वसामान्य नागरिकांची कळकळ असेल तर संकटकाळी साथ देणारे एसटी कत्राटी चालक यांना कायम स्वरूपी सेवेत घ्या असे कत्राटी चालक यांनी शासनावर टिका केली आहे .