८ जानेवारी रोजी गोजोरे गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन !

0
44

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथे दि.८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता विविध विकास कामांचे उद्घाटन आ. संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. रक्षाताई खडसे या राहणार असून प्रमुख पाहुणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, माजी जि प सदस्य रविंद्र नाना पाटील, पल्लवीताई सावकारे, भुसावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी डॉ सचिन पानझडे, बांधकाम अभियंता कोमलसिंग पाटील हे राहणार असून यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय इमारत उद्घाटन व लोकार्पण, जिल्हा परिषद शाळा नविन इमारत चे लोकार्पण, गावातील विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असे नविन वाचनालय, एन आर एल एम महिला ग्रामसंघाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे तरी परिसरातील सरपंच व उपसरपंच तसेच पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन गोजोरे येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ नंदा लक्ष्मण कोळी, उपसरपंच चंद्रकांत सोपान पाटील, ग्रामसेवक मोहन पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी केले आहे.

Spread the love