९०० एकरचं मैदान, ५०० क्विंटल बुंदी, १०० रुग्णवाहिका अन् दहा आयसीयू सज्ज; जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी!

0
35

मराठा अरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकी बाबत देखील जरांगे पाटील मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्या बीड येथे नारायण गडावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात या मेळाव्याला मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याने, सर्वांच्या नजरा या मेळाव्याकडे लागून राहिल्या आहेत.

९०० एकरावर होणार मेळावा

या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तब्बल ९०० एकरावर हा मेळावा होणार असून या मेळव्याचे व्यासपीठ देखील तयार करण्यात आले आहे. येणाऱ्या नागरिकांसाठी २०० एकर परिसरात पार्किंग करण्यात आली आहे. तर तब्बल ५०० क्विंटल बुंदी देखील तयार करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून आणि सगे सोयरे यांचा समावेश करण्यात यावा या साठी त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही घोषणा सरकारने केली नाही. त्यामुळे त्यांनी उपोषण देखील सुरू होते. दरम्यान, उद्या ते पहिला दसरा मेळावा घेणार आहे. बीडच्या नारायण गडावर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तब्बल ९०० एकरवर हा मेळावा होणार असून या ठिकाणी येणाऱ्यांसाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात ऊन पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष

मनोज जरांगे पाटील यांचा हा पहिला दसरा मेळावा राहणार आहे. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण बाबात ते काय बोलतील तसेच सरकारवर काय टीका करतील ? किंवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काही राजकीय भूमिका घेणार का अशा अनेक प्रशांची उत्तर उद्या या मेळाव्यातून मिळणार आहे.

या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहे. तसेच सध्या ऑक्टोबर महिना सुरू असल्याने वाढते तापमान पाहता नगरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी १० आयसीयू आणि १०० रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. तसेच पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. २०० एकर परिसरात ही पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

५०० क्विंटल बुंदीचे होणार वाटप

जरांगे पाटील यांच्या दासऱ्या मेळाव्यात येणाऱ्या नगरिकांसाठी तब्बल ५०० क्विंटल बुंदीचे वाटप करण्यात येणार आहे. ही बुंदी तयार करण्यात आली असून अनेक जण या साठी झटले आहेत. या बुंदीचे वाटप उद्या जेवणासह केले जणार आहे. तसेच नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

Spread the love