‘नाटू नाटू’ गाण्याचा जगभरात डंका; पटकावला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार

0
14

‘RRR’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्करवर आपलं नाव कोरत भारताची मान उंचावली आहे. या गाण्याने सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. लेडी गागा, री-री, अप्लॉज, होल्ड माय हँड, लिफ्ट मी अप आणि दिस इज ए लाईफ या गाण्यांना मागे टाकत ‘नाटू नाटू’ने हा ऑस्कर जिंकला. या गाण्याने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

या पुरस्कार सोहळ्यासाठी दिग्दर्शक एस. एस. राजामौली, संगीतकार एम एम कीरावानी, अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी हजेरी लावली होती. संगीतकार किरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन हा ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. ‘मी कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे’, असं किरावानी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी ऑस्कर जिंकल्यावर मंचावर गाणं म्हटलं. हा उपस्थित आणि सर्वच भारतीयांसाठी खूप अभिमानाचा क्षण होता.

एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला हा आरआरआर चित्रपट आहे. 24 मार्च 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

Spread the love