जळगाव -:तालुका पोलीस स्टेशन हद्दीत आव्हाना गावातील नदी पात्रातून अवैधरीत्या ट्रॅक्टरने वाळू ची चोरटी वाहतूक करीत असल्या बाबत मा.पोलीस निरीक्षक श्री. रामकृष्ण कुंभार यांना गुप्त माहिती मिळाल्याने श्री रामकृष्ण कुंभार तसेच PSI गणेश सायकर,पोहेकॉ/ विश्वनाथ गायकवाड,हरीलाल पाटील, अनिल मोरे,संदीप पाटील व रामकृष्ण इंगळे, त्याच प्रमाणे दोन पंच अश्यांनी दिनांक 18/3/2023 रोजी 3:00 वा.चे सुमारास आव्हाना गावातील नदीचे किनाऱ्या जवळ गेले असता त्या ठिकाणी एक स्वराज कंपनीचे निळया रंगाचे ट्रॅक्टर व ट्राली विना नंबर नदिपात्रातुन येताना दिसले, ट्रॅक्टर चालक रहीमखान रऊपखान पठाण वय 24 वर्षे रा.आव्हाना ता.जि. जळगाव असे आहे, ट्राली मध्ये असलेल्या वाळू बाबत ड्रायव्हरला शासकीय पास परवाना विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर ट्रॅक्टर ट्राली मध्ये असलेल्या गौण खनिज वाळू चे निरीक्षण केले असता ट्राली मध्ये असलेली 4000/रुपये की. ची एक ब्रास वाळू व 3,00,000/रुपये की. चे ट्रॅक्टर व ट्राली असे जप्त करण्यात आलेले आहे.
सदर प्रकरणाबाबत पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस स्टेशन ला CCTNS गु र न 53/2023 IPC 379,34 सह म.ज.म.संहिता 1966 चे कलम 48(7),(8) सह खान खनिज ( नियमन आणि विकास ) अधिनियम 1957 चे कलम 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास PSI गणेश सायकर हे करीत आहे.












