मुंबई – अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात सध्या दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. या प्रकरणावरुन राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचं कनेक्शन मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी जोडलंय.
सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त मुखेड इथं त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अंधारे यांनी गंभीर आरोप केला आहे.