कागदाच्या एका तुकड्यासाठी कोळी समाजाची शासनदरबारी भटकंती..

0
13

तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करणार..जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती

चोपडा –  तालुका विधानसभा मतदारसंघ सन २००९ पासून अनु. जमाती (एसटी) साठी राखीव करण्यात आलेला आहे. या मतदारसंघात आदिवासीबहुल लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या व मतदारसंख्या एकट्या कोळी समाजाची आहे. परंतु अजुनही येथील कोळयांना अनु.जमातीचे दाखले मिळत नाहीत. वर्षानुवर्षा पासुन कोळी समाजाला शासनदरबारी भटकंती करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्षं होत आहे. म्हणूनच येथील कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चा दाखला मिळाला पाहिजे, यासाठी उपविभागीय प्रांत कार्यालय अमळनेर येथे लवकरच आदिवासी टोकरेकोळी जमातीतर्फे तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करणार असल्याचे चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकान्वये सांगितले आहे.

तालुक्यातील चोपडाशहर, गोरगावले बु., गोरगावले खु., खेडीभोकरी, मंगरूळ, वटार, सुटकार, वडगाव बु., अडावद, रुखनखेडे प्र.अ., कमळगाव, पिंप्री, मितावली, पुनगाव, देवगाव, पारगाव, धानोरा, बिडगाव, पंचक, लोणी, खर्डी, वर्डी, वडती, विष्णापूर, आडगाव, विरवाडे, बोरअजंटी, वैजापूर, नागलवाडी, वराड, चुंचाळे, मामलदे, कृष्णापुर, चौगाव, लासुर, सत्रासेन, गणपुर, भवाळे, गलंगी, वेळोदे, घोडगाव, कुसुंबा, विटनेर, वढोदा, अजंतीसिम, अनवर्दे(अनेर), मोहिदे, दगडी, वाळकी, अनवर्दे(तापी), बुधगाव, हातेड बु., हातेड खु., धुपे खु., विचखेडे, घाडवेल, अकुलखेडे, चहार्डी, वेले, मजरेहोळ, निमगव्हाण, तांदलवाडी, दोंदवाडे, खाचणे, तावसे बु., कुरवेल, सनपुले, कठोरा, कोळंबा, वडगावसिम, घुमावल खु., माचला, तावसे खु., इ. गावातील ज्या कोळी लोकांच्या ग्रा.पं. कुटुंब पत्रकात अनु.जमाती अशी नोंद आहे, ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या लि.स.वर टोकरेकोळी अशी नोंद आहे, ज्यांच्या सातबारा उताऱ्यावर आदिवासीची ३६ व ३६ अ ची नोंद आहे, ज्या गावात आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ठक्कर बाप्पा योजना व शबरी घरकुल योजना राबवली आहे, ज्यांची दाखल्यासाठीची जुनी प्रकरणे प्रलंबित आहेत, जे नविन प्रकरणे दाखल करतील अशा सर्व कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चा दाखला मिळाला पाहिजे व याआधी असे दिलेले दाखले केंद्रिय (सी फॉर्म) नमुन्यात दिले पाहिजेत, कोळी लोकांच्या जमिनींवर ३६ व ३६ अ ची नोंद झाली पाहिजे, याबाबतचे निवेदन संबंधित विभागासह शासनदरबारी पाठविणार असल्याचेही सामा. कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर, जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, म.वाल्मिकी नगर मित्रमंडळाचे सर्व सदस्य यांनी म्हटले आहे.

Spread the love