राहुल गांधींच्या निषेधार्थ भुसावळ भाजप ने केले जोडे मारो आंदोलन

0
36

भुसावळ – ओबीसी समाजा विरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज भुसावळ भारतीय जनता पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी अपमानास्पद वक्तव्य करणारे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी मुर्दाबाद..! मोदी जी का अपमान नही सहेगा हिंदुस्तान..!अशा घोषणा दिल्या.

या निषेधार्थ आंदोलनात भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी,सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, दिलीप कोळी, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, संजय पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, बापु महाजन, पिंटू ठाकूर, सतिश सपकाळे, अर्जुन खरारे, प्रविण इखनकर, धनराज बाविस्कर,संजय भिरुड, सचिन सपकाळे, प्रा.विलास अवचार, जयंत माहुरकर, अनिल पाटील, भावेश चौधरी, महिला मोर्चाच्या अनिता आंबेकर,कविता ठाकूर, सागर चौधरी, रुपेश देशमुख, अविनाश बऱ्हाटे, युवा मोर्चाचे श्रेयस इंगळे, गोपीसिह राजपुत, लोकेश जोशी, चेतन बोरोले, जयप्रकाश शुक्ला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love