भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव व गोंभी येथील पाणीपुरवठा कर्मचारी यांचे वेतन थकबाकी मुळे गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून काल पासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.
याबाबत सरपंच दिपक सावकारे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामस्थांकडे घरपट्टी पाणीपट्टी थकीत झाली आहे . शेतकऱ्यांचा हंगाम योग्य भाव मिळत नसल्याने घरात पडून आहे विशेष म्हणजे मार्च अखेर आहे त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विज बिल साठी तगादा लावला त्यामुळे विज बिल भरावे लागले त्यात कर्मचारी पगारासाठी अडून बसले आणि वसुली नसल्याने कर्मचारी यांचा वेळेवर पगार होत नसल्याने दि २९ मार्च रोजी मासिक सभेत पाणीपुरवठा कर्मचारी सचिन शिरोळे व राहुल सपकाळे ( गोंभी ) यांनी अर्ज दिला . परंतु रात्री अचानक पाणीपुरवठा होणार नसल्याचा मेसेज गृप वर पाहिल्याने ग्रामस्थ विचारात पडले असून थकबाकी वाले जाऊ द्या परंतु नियमित कर भरणाऱ्यांना तरी पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.
विशेष म्हणजे रामनवमी निमित्त शासकीय सुट्टी असताना देखील ग्रामसेविका रत्नमाला घुले व कर्मचारी गावात कर वसुली साठी भटकंती करीत होते.काही वसूल झाल्यास या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना देऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
मात्र पुर्व सूचना न देता पाणीपुरवठा कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे.