भुसावळ – येथे जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे ( विकास ) ग्रामिण भागातील शेतकरी व दूध उत्पादन लोकांकडून वाहनाद्वारे दूध संघात आणले जाते.
मात्र दि २९ मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दूध वाहन क्रमांक एम एच १७ बी डी १९१९हे वाहन बेलव्हाळ येथील शेतकऱ्यांनी येथील श्री खंडेराव मंदिर परिसरात असलेल्या विद्युत रोहित्रा जवळ दूधा मध्ये पाण्याची भेसळ करीत असताना दूध उत्पादन लोकांनी वाहनावर चालक आणि त्याच्या सोबत असलेल्या एकाला पकडले.
यावेळी अविनाश हरी भंगाळे रा. बेलव्हाळ यांनी विकास दूध कार्यालयात फोन केला असता एका कागदावर पंचनामा करून घ्या आणि वाहन सोडून द्या असे सांगितले.त्यानंतर पुन्हा फोन केला असता एकाही अधिकाऱ्याने फोन घेतला नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.