भुसावळ – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे विविध कार्यकारी सोसायटी ने यंदाही १०० टक्के बॅंक कर्ज फेड करुन खरोखरच विकासाची परंपरा टिकवून ठेवण्यात यश संपादन केले आहे.
सुनसगाव विकासोची ही परंपरा सहकार महर्षी दादासाहेब दामू पांडू पाटील यांच्या काळापासून सतत सुरू आहे. ही सोसायटी १०० टक्के होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे क्षेत्रिय अधिकारी , सुनसगाव शाखा व्यवस्थापक व कर्मचारी तसेच विकासोचे चेअरमन सुदाम भोळे व्हा.चेअरमन व संचालक मंडळ तसेच विविध कार्यकारी सोसायटी चे सचिव योगेश पाटील , संगणक परिचालक हर्षल पाटील शिपाई जितेंद्र पाटील यांचे योगदान लाभले . यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार केला तर सर्व सभासद शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड वेळेवर केल्याने चेअरमन व संचालक मंडळाने शेतकरी सभासदांचे आभार मानले आहेत.