भुसावळ – येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील श्री खंडेराव महाराज यात्रा दि.६ ते ९ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार असून येथील २०३ वर्षांपासून बारा गाड्या ओढण्याचा मान असलेल्या धोबी घराण्याचे युवराज मोतीलाल धोबी हे यंदा बारा गाड्या ओढणार आहेत.तसेच जळगाव जिल्हा पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे .
यात दि ६ एप्रिल रोजी सकाळी श्री खंडेराव महाराज पुजा व संध्याकाळी श्री सत्यनारायण पूजा , दि ७ रोजी सकाळी ८ वाजता श्री ची पूजा संध्याकाळी ४ वाजता कठडे मिरवणूक आणि संध्याकाळी ५ वाजता बारा गाड्या उत्सव व रात्री ८ वाजता प्रियाबाई रावेरकर यांच्या लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे तसेच दि ८ व ९ रोजी सकाळी ८ वाजता श्री ची पूजा व रात्री ८ वाजता प्रियाबाई रावेरकर यांच्या लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे .ही यात्रा सलग चार दिवस चालणार आहे.
या यात्रेत आतापर्यंत भगत दामू धोबी ,भगत मोतीलाल धोबी ,भगत सुदाम धोबी यांनी बारा गाड्या ओढल्या आहेत.यावर्षी याच कुटुंबातील युवराज धोबी यांना हा मान मिळाला आहे.
यात्रेसाठी यात्रा समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष लालचंद पाटील , उपाध्यक्ष योगेश पाटील , खजिनदार ज्ञानदेव लोखंडे , सचिव मोहन येवले , सेक्रेटरी पंकज महाजन , सदस्य प्रकाश बोंडे ,किरण पाटील किशोर पाटील आहेत. तसेच गावातील सर्व पदाधिकारी व मित्र मंडळाचे कार्यकर्ते सहकार्य करणार असून यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी नशिराबाद पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे , पोऊनि राजेंद्र साळुंखे व पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवणार आहेत.या यात्रेचा आनंद परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.