राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विद्यार्थी-पालक जागृती अभियान- उर्वेश साळुंखे  

0
16

चोपडा – विद्यार्थी आणि पालकांची अनेक शैक्षणिक संस्थांकडून दिशाभूल होते. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी-पालक जागृती अभियान संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार आहे . विद्यार्थी व पालक अनेक वेळा शालेय नियमांबाबत अनभिज्ञ असतात.

त्याचा गैरफायदा घेत अनेक खासगी शाळा विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करत मनमानी व मुजोर कारभार चालु ठेवुन पालकांचे आर्थिक शोषण करतात. परंतु पालक आपल्य पाल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी कर्ज काढून शुल्क भरतात. हा सर्व गैरप्रकार टाळण्यासाठी स्वातंत्र्य हेल्पलाइन सुरू करणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी सांगितले. या अभियानामुळे सर्व विद्यार्थी व पालकांचा फायदा होणार आहे.

विद्यार्थी व पालकांनी थेट संपर्क साधावा

कुठल्याही संस्थेकडू विद्यार्थी किंवा पालकांची आर्थिक पिळवणूक होत असेल तर त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या स्वतंत्र सेल तात्काळ मदत करेल.

उर्वेश साळुंखे जिल्हासरचिटणीस:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, जळगाव)

 

 

 

 

Spread the love