माविआच्या वज्रमूठ सभेच्या भाषणावेळीच अजान सुरू झाली, मग उद्धव ठाकरेंनी काय केलं?

0
44

छत्रपती संभाजीनगर – महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवातच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो आणि भगिनींनो म्हणत केली.1988 साली बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करू, असा शब्द दिला होता. भाजपला जमलं नाही ते आपण करून दाखवलं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अलीकडे हिंदू जनआक्रोश सुरू केला आहे. हा जनआक्रोश शिवसेना भवनपर्यंत आणला.

जगातला सर्वात मोठा हिंदू नेता असताना आक्रोश करावा लागतो. आमच्या सरकारच्या काळात कुणाला आक्रोश करण्याची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाषणावेळीच अजान सुरू उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच अजानला सुरूवात झाली, पण उद्धव ठाकरे यांनी त्यांचं भाषण थांबवलं नाही.मी हिंदुत्व सोडलं असं मला सांगा मी घरी जाऊन बसेन, मी सगळ्यांना सांभाळलं होतं.

मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता, मग काश्मीरमध्ये मुफ्तीच्या मांडीला मांडी लावून बसले होते, ते काय होतं? तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व, अशी टीका ठाकरेंनी केली. सत्ता गेली तरी आम्ही एकत्र आहोत, अजून घट्ट झालो आहोत. मला म्हणता सत्तेसाठी तळवे चाटले, तुम्ही सत्तेसाठी मिंदेचं काय चाटत आहात? तिकडे सत्ता पाडून नितीश कुमारचं काय चाटत होतात? तुमचा कोणीही सोम्या गोम्या आरोप करेल, आम्ही सहन करायचा, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

Spread the love