सामाजिक भावना दुखावल्यास पोस्ट टाकणाऱ्यावर होणार कारवाई डॉ . कुणाल सोनवणे

0
15

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – अल्पवयीन मुलांमध्ये कळत नकळत सोशल मिडियाच्या माध्यमातुन दोन समाजामध्ये द्वेष पसरवुन तेढ निर्माण करणारे व दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावणारे पोस्ट आपल्या मोबाइलव्दारे टाकणे आदी विषयांवर आता आयटी कायद्याच्या कलमान्वये कारवाई करण्यात येणार असून जागृत पालकांनी आपल्या मुलांवर मोबाइलचा वापर करतांना नजर ठेवणे अत्यंत महत्वाचे असल्याची माहीती फैजपुर विभाग पोलीस उपअधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी यावल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिली.येथील पोलीस स्टेशनच्या आवारात दि.४ एप्रील रोजी दोन दिवसानंतर येणारे यावल शहरातील प्रसिद्ध श्री बालाजी रथोत्सव,दोन दिवस ओढल्या जाणाऱ्या बारागाडया, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व मुस्लिम बांधवांची रमजान ईद या सर्व सणाच्या पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीला पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे,राखीव पोलीस दलाचे पोलीस उपनिरिक्षक प्रविण उमाळकर,पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे,तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह विविध गावातील पोलिस पाटील,शहरातील शांतता समितीचे सदस्य चंद्रकांत देशमुख,प्रा.मुकेश येवले,गोपाळसिंग पाटील,हाजी गफ्फार शाह,रहीम रजा,एम. बी.तडवी,डॉ.निलेश गडे,अरूण गजरे,अशोक बोरेकर,चेतन अढळकर,अ.करीम मन्यार,नितिन सोनार,नईम शेख,हकीम शेख,पप्पु जोशी यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे,पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,अरूण गजरे यांनी येणारे श्री बालाजी रथोत्सव,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,रमजान ईद हे सर्व धार्मिक सण सर्वसमाज बांधवांनी शांततेत व एकत्र मिळुन साजरे करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Spread the love