चोपडा (प्रतिनिधी):-तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीच्या लोकांनी टोकरेकोळीच्या जातप्रमाणपत्रासाठी अमळनेर येथील उपविभागीय (प्रांत) अधिकारी कार्यालयाकडे ई सेवा सेतू सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत. कारण ह्या कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजासाठी “वाट्टेल ते करू- जिंकु किंवा मरू”, ह्या तत्वावर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे. त्याआधी कोळी लोकांनी २५ एप्रिल पर्यंत आपापल्या गावातून जास्तीतजास्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना श्री एकविरा कृषी सेवा केंद्र, दु.नं.२, बापूजी कॉम्प्लेक्स, यावल रोड, चोपडा येथे उपलब्ध आहेत.
विशेष असे की, निवडणुक आयोगाने चोपडा विधानसभा मतदारसंघ सन २००९ पासुन अनु.जमातीसाठी राखीव केलेला आहे. त्यापुर्वी संबंधित विभागातर्फे टोकरेकोळी (एसटी) चे दाखले दिले जायचे. त्यानंतर का देण्यात येत नाहित ? हा प्रश्न सुध्दा एैरणीवर आहे. म्हणुनच कोळी समाजाने ऑनलाईन अर्ज सादर करून ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर, जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, म.वाल्मिकी नगरचे मित्रमंडळ यांनी ह्या पत्रकान्वये केलेले आहे.