हेमकांत गायकवाड
चोपडा:बुधगाव: येथे दि. १ सप्टेंबर रोजी आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांन करता महाराष्ट्र शासनाची “खावटी अनुदान योजना” अंतर्गत ४१ कुटुंबांना मटकी एक १ किलो, चवळी २ किलो, हरभरा ३ किलो, पांढरा वाटाणा १किलो, तूरदाळ २किलो, उडीत डाळ १किलो, मीठ ३किलो, गरम मसाला ५०० ग्रम, शेंगदाणे तेल १लिटर, मिरची पावडर १ किलो, चहा पावडर ५०० ग्रम, साखर ३किलो, असे १८ किलो.ग्रम व १ लिटर असे अन्य धान्य, कड धान्य, व जीवनावश्यक वस्तू किट बुधगाचे सरपंच सौ.सुनीताबाई साळुंखे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी सरपंच सुनिताबाई साळुंखे ग्रामसेवक श्री.ठाकरे भाऊसाहेब, उपसरपंच सौ. इंदुबाई भिल, पोलिस पाटील बापु धनगर, ग्रामपंचायत सदस्य श्री. कैलास कोळी,सौ. पवित्राबाई सोनवणे,श्री. यशवंत सोनवणे, चंद्रशेखर वाघ, समाधान बाहेर, सौ.भारती साळुंखे, निवृत्ती कोळी, व गावातील जेष्ठ मंडळी श्री. गुलाबराव साळुंखे, शिवाजी कोळी, भरत धनगर, आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
खावटी अनुदान योजने,, अंतर्गत माझ्या बुधगाव गावाला ४१ कुटुंबांना जीवन आवश्यक वस्तू चे वितरण झाले. या बद्दल त्या गरिबांच्या चेहरा वरिल आनंद पाहुन मन भरून आले. व खरोखर “खावटी अनुदान योजना,, ठरते आहे आदिवासी चा आधार!_ या बद्दल महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार.