वेळोदे येथील रहिवासी व भरवस हायस्कुलचे आर.आर.सोनवणे पुरस्काराने सन्मानित ; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव…..! 

0
53

हेमकांत गायकवाड

चोपडा: राष्ट्रीय क्रिड़ा दिनानिमित्त हॉकी असोसिएशन व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा गुणवंत क्रिड़ा पुरस्कार श्री,आर.आर. सोनवणे श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय,भरवस ता. अमलनेर याना माजी आमदार चंद्रकांत सोनवणे,माजी महापौर विष्णूभाऊ भंगाले , डॉ. केतकी पाटील जिल्हा क्रिड़ा अधिकारी मिलिंद दिक्षित,क्रिड़ा संचालक दिनेश पाटील यांच्या उपस्थितीत डॉ.एपीजे अब्दुल कलाम सभागृहात पुरस्काराने गौरवण्यात आले.

सोनवणे हे अमलनेर तालुका क्रिड़ा समिति सचिवपदि असून आपल्या विद्यालयतील विद्यार्थी खो खो,कबड्डी, व्हालिबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन संघ तालुका, जिल्हा स्तरावर व् ग्रामीण भागातील एकमेव शाळा फुटबॉल स्पर्धेत जिल्हा उपविजेते ठरली आहे.

आर. आर.सोनवणे याना मिळालेल्या गुणवंत पुरस्कारबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रा.डॉ.संजय सोनवणे सचिव व् उपक्रमशील मुख्याध्यापक श्री.व्ही.एस.सोनवणे तालुका, जिल्हा क्रिड़ा संघटना यांनी अभिनंदन केले.तसेच पुरस्कार मिळाल्याने अनेर परिसरातुन अभिनंदन होत आहे.

Spread the love