अनवर्दे खु.विचखेडा शिवारात शॉर्टसर्किटमुळे मक्यासह चारा जळून खाक

0
18

चोपडा‌ – येथील शेतकरी यांच्या मालकीची शेती विचखेडा शिवारात आहे. गट.नं. 133/2 मध्ये मक्का या पिकाची लागवड केली होती. अचानक शॉर्टसर्किट मुळे मकासह चाऱ्याला भीषण आग लागल्यामुळे तीन एकर शेतातील मक्या सह चारा जळून खाक झाला आहे.

सदरील घटना लक्षात घेता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याची भेट घेतली. नुकसान झालेल्या शेतकऱ्याला प्रशासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी विनंती उर्वेश साळुंखे यांनी प्रशासनाकडे केली याप्रसंगी उमेश बोरसे, रामकृष्ण धनगर ,समाधान धनगर आदी उपस्थित होते.

Spread the love