साकरी येथे जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनेचे खासदार रक्षा ताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते भूमिपूजन

0
39

भुसावळ प्रतिनिधी – तालुक्यातील साकरी येथे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या “जल जीवन मिशन” अंतर्गत “पाणी पुरवठा” योजनेचे खासदार श्रीमती रक्षा ताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थित भूमिपूजन करण्यात आले.

देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या महत्वा कांक्षे नुसार देशात ग्रामीण भागातील प्रत्येक गावात पिण्याचे स्वच्छ पाणी म्हणजे “हर घर जल” पोहचविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या “जल जीवन मिशन” अंतर्गत सदर पाणी पुरावठा योजना मंजूर करण्यात आलेली असुन, यासाठी रावेर लोकसभा क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचा सदर योजनेच्या आराखड्यात समावेश होणे बाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी निरंतर पाठपुरावा केला होता.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्यासह भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, मुरलिधर (गोलू) पाटील, सदानंद उन्हाळे, माजी जि.प. सदस्य वसंत झारखंडे, साकरी सरपंच विनोद सोनवणे, उपसरपंच रोशन पाटील, प्रशांत पाटील, भाजयुमो तालुका सरचिटणीस जितू कोळी, उमेश चौधरी, शिवाजी पाटील, कैलास महाजन, ग्रामविकास अधिकारी प्रितम शिरतुरे यांच्यासह ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love