भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत जितेंद्र काटे यांची उमेदवारी

0
35

भुसावळ – सध्या सर्वत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बोलबाला सुरू असून अनेक संचालक यात्रेसाठी रवाना झाले आहेत.भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन पॅनल असून दोन अपक्ष उमेदवार आहेत.विशेष म्हणजे सर्व ठिकाणी एकास एक काट्याची लढत असून विमुक्त जाती व जमाती व विशेष मागास प्रवर्गात एका जागेसाठी चार उमेदवार आहेत .त्यात सुनसगाव येथील रहिवाशी व सुनसगाव विकासोचे संचालक काटे जितेंद्र नथ्थु यांची उमेदवारी सर्वांना आवाहन ठरत आहे. या निवडणुकी संदर्भात कानोसा घेतला असता दोन्ही पॅनल पैकी एक हाती सत्ता कोणालाही मिळणार नाही अशी चर्चा सुरू आहे मात्र विमुक्त जाती व जमाती व विशेष मागास प्रवर्गातील छत्री निशाणी असलेले अपक्ष उमेदवार जितेंद्र काटे यांचा ग्रामिण भागात दांडगा संपर्क असल्याने व वैयक्तिक सर्व मतदारांशी चांगला संपर्क असल्याने जितेंद्र काटे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Spread the love