सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – नुकत्याच झालेल्या वादळामुळे येथून जवळच असलेल्या गोजोरा रस्त्यावरील श्री शक्ति पेपर मील च्या बाॅयलर ची चिमणी उडाल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सध्या गेल्या दोन तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यात कुठेना कुठे वादळीवाऱ्यासह गारपीट होत आहे याचा फटका या परिसराला ही बसला आहे.वादळ मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात असलेल्या कंपन्यांना मोठा फटका बसला असून श्री शक्ति पेपर मील ची बाॅयलर ची चिमणी उडाल्याने काही काळ कंपनीत धावपळ उडाली सुदैवाने लाईट बंद असल्याने जिवीतहानी टळली.