महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईत पार पडली. या सभेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी भाषणं केली.
या भाषणावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि राज्यातल्या शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आव्हाड म्हणाले, मुंबई महाराष्ट्राला अशीच मिळाली नाही त्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. ही मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे. परंतु मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं काम गेल्या दहा वर्षात सुरू आहे.
आव्हाड म्हणाले, “विविध संस्थांची मुख्य कार्यालयं जी मुंबईत होती ती आता अहमबादला जात आहेत, दिल्लीला जात आहेत. कारण मुंबईवर राग असलेली माणसं दिल्लीत बसली आहेत. त्यांना मुंबईचे पाय कापायचे आहेत.” दरम्यान, राज्यातल्या शिंदे – फडणवीस सरकारलाही त्यांनी धारेवर धरलं. अलिकडच्या काळात राज्यात काही रॅप गाणाऱ्या तरुण कलाकारांवर शिंदे-फडणवीस सरकारने कारवाई केली आहे. या कारवाईचा आव्हाड यांनी निषेध नोंदवला. तसेच स्वतःदेखील एक रॅप साँग आव्हाड यांनी गायलं.
आव्हाड म्हणाले, रॅप साँग लिहणाऱ्या पोरांना या लोकांनी जेलमध्ये टाकलं. आता मी त्यावर स्वतःची कविता केली आहे.
आव्हाडांचं रॅप साँग
अरे पचास खोका.
अरे पचास खोका तुमने खाया. महाराष्ट्रने क्या पाया?
अरे पचास खोका. महाराष्ट्रने क्या पाया?
लडके ने उसके गले मे लाया, तो पुलिसने उसे जेल में लाया
अरे पचास खोका तुमने खाया. महाराष्ट्रने क्या पाया?
अरे पचास खोका बोलतेही तुम क्यूं चिडते हो?
अरे पचास खोका बोलतेही तुम क्यूं चिडते हो?
अपनाही रिश्ता पचास खोके से क्यूं जोडते हो?