भुसावळ हादरले ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून चार महिन्याची गर्भवती

0
29

भुसावळ – मी तुझ्या सोबत लग्न करणार, म्हणत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. यानंतर आता पिडीता चार महीन्याची गर्भवती झाली असून मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात एका २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, जानेवारी महिन्यात चार महिन्याआधी इमरान मुख्तार सैय्यद (वय २२) याने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या मामाच्या घरात पिडीतेस इशाऱ्याने बोलून घेतले.

यावेळी त्याने पिडीतेस ‘मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे, असे सांगून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच पिडीत मुलीसोबत सेल्फी फोटो काढून इन्टाग्रामवर स्टोरी ठेवली. यानंतर आता पिडीता चार महीन्याची गर्भवती आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि प्रकाश वानखडे हे करीत आहेत.

Spread the love