बेलव्हाळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरी जखमी

0
35

भुसावळ  – तालुक्यातील बेलव्हाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्यात बिबट्याने रात्री दोन वाजता गायीच्या वासरावर हल्ला केला असता येणाऱ्या आवाजाने शेजारी जागे झाले असता बिबट्याने शेतीशिवाराकडे धुम ठोकली.हा गुरांचा गोठा मधुकर परमानंद भंगाळे यांचा असून दोन वर्षांपूर्वी याच गोठ्यात बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता.एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा हल्ला करण्यात आल्याने बेलव्हाळ येथील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी केली जात आहे.

Spread the love