छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट, भिवंडीतून अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
49

मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन मुलाला भिवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलाने इन्स्टाग्रामवर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये मुलाने टीपू सुलतान याचे कौतुक करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. याची तक्रार दाखल झाल्यानंतर भिवंडी पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Spread the love