सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथील वाघुर नदीच्या पात्रात दि १४ मे रोजी नशिराबाद पोलीस स्टेशन च्या हद्दीत पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आला होता रितसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात जळगाव येथे पाठविण्यात आला होता . बरेच दिवस होऊन ही या बाबत तपास लागत नसल्याने त्या मृतदेहाला अखेर बेवारस नोंद करण्यात आली आहे.या मृतदेहाच्या अंगावर लाल रंगाचा बनियन व लाल रंगाची अंडरपॅन्ट होती .या परिसरात पोलीसांनी शोध घेतला असता कुठेही बूट चप्पल किंवा कपडे आढळून आले नाही . तसेच या पंचक्रोशीतील कोणीही व्यक्तीची मिसींग नोंद दाखल नाही.त्यामुळे या इसमाची ओळख पटविणे पोलीसांना आवाहन आहे तरीही नशिराबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत आहेत.या बाबत काही माहिती पडल्यास नशिराबाद पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.