चोपड्याचे आमदार लताताई सोनवणे यांच्या गाडीला वाळूच्या डंपरची जोरदार धडक..! 

0
70

जळगाव – :आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला करंज गावाजवळ अपघात झाला असून यात ते किरकोळ जखमी झाल्याचे समजते.

आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे आज आपल्या वाहनाने चोपडा तालुक्यातील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असतांना करंज गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारला एमएच १९- झेड ६२४५ क्रमांकाच्या डंपरने धडक दिली. यात कारचे नुकसान झाले असून सोनवणे दाम्पत्यासह कारच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

सुदैवाने या अपघातात कुणाला गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी तेथे धाव घेतली.

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा अलीकडच्या काळात ऐरणीवर आला आहे. यातून अनेकदा लहान-मोठे अपघात देखील झाले आहेत. आज झालेला अपघात हा देखील वाळू वाहतूक करणार्‍या डंपरचालकाच्या बेपर्वाईने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यामुळे वाळू तस्करांना आळा नेमका कधी बसणार ? असा प्रश्‍न आता पडला आहे.

शेवटी अस म्हणाव लागेल देव तारी त्याला कोण मारी,,,,

Spread the love