हेमकांत गायकवाड
चोपडा :५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षक दिन. जगात सर्वात पवित्र दान असेल तर ते विद्यादान होय. म्हणजेच भारताचे भविष्य घडविण्या मागे महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम शिक्षक करत असतात. अर्थात गुरुचे ऋण व्यक्त करण्याचा आजचा दिवस.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रसंगी शिक्षकांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अविनाशजी राणे, कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एम व्ही. पाटील ,माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. आर .पाटील, पंकज इंग्लिश मीडियम च्या प्राचार्या निता पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले यांनी शिक्षकांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिष्णा कानडे व याशिका जैस्वाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले.