साकळी – आज दुपारच्या दरम्यान साकळी गावासह परिसराला जोरदार वादळाचा पुन्हा तडाखा बसला यात साकळीत काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाडं पडली आहे तर बऱ्याच ठिकाणी गुरांच्या गोठ्यावरील तसेच राहत्या घरांवरील पत्रे उडाली.या वादळाच्या तडाख्याने मुख्य वाहतूकी रस्त्यांवर मोठी झाडे उन्मळून पडलेली आहे.सुदैवाने कोठेही जीवित हानी झालेली नसल्याचे समजते.वादळा दरम्यान साकळीत मान्सूनच्या सरीही कोसळल्या. जोरदार हवा सुटायला लागली व निसर्गाने आपले रूप अचानकपणे पालटले रौद्र रुप धारण केले. व जोरदार हवेचे भयावह वादळात रूपांतर झाले.जोरदार वादळामुळे धुळीचे लोट उडत होते.व जवळपास अर्धा ते पाऊण तास वादळी वारा सुरू होता.गेल्या तीन दिवसांपूर्वी म्हणजेच दि.४ रोजी वादळ झाले या वादळात परिसरातील शेतांमधील केळी बागांचे खूप मोठे नुकसान झाले होते.तर तीन दिवसापूर्वीच्या वादळात शेतातील जी केळीची झाडे वाचली होती ती आजच्या वादळात पूर्णपणे जमीनदोस्त झालेली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून ते शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. त्याचप्रमाणे आजच्या वादळात गावातील अनेकांची घरावरची व इतरत्र ठिकाणावरची पत्रे उडाली यात भवानीदेवी मंदिर परिसरातील कै.मंगल सोनार यांच्या मालकीच्या ढोरांच्या गोठ्यावरील संपूर्ण पत्रे उडाली तर कुरेशी वाड्यालगत कय्युम शहा बाबा यांच्या घराजवळील झाडाची भली मोठी फांदी तुटून विजेच्या तारांवर अडकली.जर ही फांदी विजेच्या तारां ऐवजी जमिनीवर खाली पडली असती तर दोन ते तीन घरांची मोठी हानी झाली असती. असे येथील रहिवाशांनी सांगितले.वादळानंतर काही वेळ जोरदार पावसाच्या सरीही कोसळल्या व मान्सूनने हजेरी लावली.पावसाचा शिडकावा झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.वादळा दरम्यान विज गेलेली होती तर विजेचा अधून-मधून लपंडाव सुरू होता. वादळामुळे परिसरातील शेतकरी वर्ग चांगलाच धास्तावलेला आहे