यावल – जिल्हा निवडणूक आयोगाच्या सुचनेवरून साकळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकी करता गावातील एकूण सहा वार्डनिहाय आरक्षण घोषित करण्यात आले.यात महिला आरक्षणानुसार एकूण नऊ जागांवर महिलांना सधी मिळणार आहे. दि.२० जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ग्रा.पं.सभागृहात वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी ए.के.चौधरी होते तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साकळीचे तलाठी व्ही.एच.वानखेडे,
ग्रामविकास अधिकारी विजय साळुंखे,प्रशासक अधिकारी के.सी.सपकाळे हे अधिकारी वर्ग उपस्थित होते.सदर ग्रामसभेत एकूण सहा वार्डनिहाय आरक्षण १७ जागांसाठी जाहीर करण्यात आले.यात वार्ड क्रं.१ मध्ये तीन जागांपैकी सर्वसाधारण १,अनु.जाती (महिला राखीव)१,इमाव( महिला राखीव),वार्ड क्रं.२ मध्ये तीन जागांपैकी सर्वसाधारण १,अनु.जमाती (महिला राखीव)१,
अनु.जमाती(महिला राखीव)१,वार्ड क्रं.३ मध्ये दोन जागांपैकी अनु.जमाती१, अनु.जमाती (महिला राखीव)१,वार्ड क्रं.४ मध्ये तीन जागांपैकी इमाव १, सर्वसाधारण १,सर्वसाधारण (महिला राखीव)१,वार्ड क्रं.५ मध्ये तीन जागांपैकी सर्वसाधारण १,इमाव १,सर्वसाधारण(महिला राखीव)१,वार्ड क्रं.६ मध्ये तीन जागांपैकी सर्वसाधारण १, इमाव(महिला राखीव)१,
सर्वसाधारण(महिला राखीव)१ या नुसार आरक्षण असेल.घड्याळाच्या फिरत्या काट्याप्रमाणे फिरते आरक्षण काढण्यात आलेले आहे.तसेच दि.२० पासून आरक्षण सोडतीवर हरकती घेता येणार आहे.दिलेल्या मुदतीत ग्रामस्थांनी घेतलेल्या हरकतींवर संबंधित अधिकाऱ्यांकडून निर्णय घेतला जाईल व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून आरक्षण सोडतीला अंतिम स्वरूप दिले जाईल.असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. या सभेस माजी ग्रा.पं.सदस्य जहाँगीरखाँ कुरेशी, दिनकर माळी,शरद बिराडे, खतिब तडवी,दिपक पाटील, सै.अश्पाक सै.शौकत,राजू सोनवणे,सर्फराज तडवी यांचेसह सचिन चौधरी,मनू निळे,डॉ.सुनिल पाटील,किसन महाजन,नितीन फन्नाटे,जयंत बोरसे, शेख इक्बालभाई, विलास पवार,राजू जंजाळे,ईश्वर कोळी,आकाश पाटील यांच्यासह असंख्य ग्रामंस्थ उपस्थित होते.या सभेत उपस्थित काही ग्रामस्थांनी चावडी वाचन कार्यक्रम का घेतला नाही ? असा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारला.तसेच इतर काही ग्रामस्थांनी आरक्षणाबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले.
वार्ड क्रं.३ च्या आरक्षणावर हरकत – सभेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी वार्ड क्रं.३ बाबत लोकसंख्येचे वाचन केलेले आहे.ते चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले असून सदर वार्डात ओबीसी व जनरल एकूण मतदारसंख्या ५०% च्या वर आहे.आरक्षण सोडतीत सदर वार्डाचे शंभर टक्के आरक्षण काढण्यात आल्याने ओबीसी व जनरल मतदानावर अन्याय होत आहे.तरी ओबीसी व जनरल मतदारांना योग्य असा न्याय देण्यात यावा अश्या आशयाची लेखी हरकत किसन महाजन यांनी घेतली आहे.तरी या हरकतीवर काय निर्णय होतो ? हे पाहणे महत्त्वाचे आहे. .