श्री स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालयातर्फे गुणवंत शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न…! 

0
38

हेमकांत गायकवाड

चोपडा :५ सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी श्री स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालयातर्फे तालुक्यांतील प्राथमिक, माध्यमिक विभागातील गुणवंत आदर्श शिक्षकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब पी बी पवार (मा प्राचार्य), प्रमुख वक्ते प्रा संदीप पाटील ,प्रा जगदीश पठार व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीस महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी चोपडा तालुक्यातील जिल्हा परिषद,इंग्रजी माध्यम ,माध्यमिक,महाविदयलाय, आश्रमशाळा आदी माध्यमाच्या १७ शिक्षकांचा यावेळी मानपत्र , पेन व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा संदीप पाटील यांनी शिक्षणाचे पूर्वीचे आणि आताचे शिक्षणाचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले..

अध्यक्षीय भाषणात नानासाहेब पी बी पवार यांनी खरा शिक्षकांचे शिक्षण क्षेत्रात स्थान किती महत्वाचे आहे.शिक्षक हा भावी पिढीचा आधारस्तंभ आहे असे म्हटले.

त्यात आधार पानपाटील – जि प शाळा कर्जणे,डॉ शैलेश कुमार वाघ- कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा, श्रीमती भावना पाटील- कन्याशाला अडावद ,प्रभाकर पाटील-जि प शाळा खाचणे , शैलेंद्र चव्हाण-शा.शि पाटील विद्यामंदिर चहार्डी, श्रीमती मनीषा पाटील-जि प शाळा घुमावल , किशोर पाटील-जि प शाळा देवगाव,सचिन पाटील-पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय अकुलखेडे, एल एच पाटील-विद्याभारती माध्यमिक विद्यालय विरवाडे, संजय बारी-महिला मंडळ शाळा चोपडा, किरण पाटील -प्रताप विद्या मंदिर चोपडा, भालचंद्र पवार-आश्रमशाळा सत्रासेंन इब्राहिम तडवी-पंकज ग्लोबल पब्लीक स्कूल चोपडा, संजीव शेटे-जि प शाळा चौगाव,राकेश विसपुते-विवेकानंद विद्यालय चोपडा,व्ही सी महाजन-म गांधी विद्यालय लासुर, विनोद पाटील -कस्तुरबा विद्यालय चोपडा आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीवितेसाठी प्रा संदीप पाटील,प्रा मुकेश पाटील ,प्रा निलेश पाटील आदीनी परिश्रम घेतले .. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन किरण बडगुजर यांनी केलेकेले.

Spread the love