यावल – येथील महात्मा फुले चौकातील मनुदेवी हार्डवेअर दुकानास दि.२२ राजीच्या रात्री साडेआठ वाजेदरम्यान शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली असून दुकानातील पीव्हीसी पाईप व इतर साहीत्य जळाले आहे.या घटनेत संबधित दुकानदाराचे मोठे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.सदर दुकान चुंचाळे येथील भरतसिंग राजपूत यांच्या मालकीचे असून ते रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले होते.दरम्यान त्यांना आपल्या दुकानात आग लागल्याची घटना परिसरातील नागरिकांकडून कळाली व त्यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेऊन दुकान गाठले. दुकानातील आग विझविण्यासाठी परिसराती नागरिकांनी मोठी मदत केली.तसेच या घटनेदरम्यान आग आटोक्यात यावी म्हणून विज कार्यालयाकडून तात्काळ लाईट बंद करण्यात आली.