रावेर तालुक्यातील कांडवेल पुनर्वसित गाव विकासाच्या प्रतीक्षेत..

0
13

रावेर – कांडवेल येथील पुनर्वसित भागाच्या विकासासाठी आ.चंद्रकांत पाटील यांनी आज दि.24/6/2023. रोजी पुनर्वसन टप्पा क्र.3 संदर्भात ग्रामस्थांची बैठक घेतली आहे.बऱ्याच वर्षांपासून काड वेल हे गाव पुनर्वसन होऊन ही मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रस्ते नाही,पाणीपुरवठा योजना नाही,गटारी नाही,विद्युत पुरवठा नाही, अशा अनेक समस्यांना गावकऱ्यांना सामोरे जावे लागते. आणि म्हणून आ.साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले की या गावातील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवा आणि जास्तीत जास्त नवीन कामे मंजूर करून चांगल्या प्रतीचे कामे करून घ्या .या पुढे कशाचीही दिरंगाई झाली तर ती मी खपवून घेणार नाही असे ठणकावून सांगितले.या बैठकीत रावेर तालुक्यातील तहसीलदार बंडू कापसे,पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अधिकारी,अभियंता कुलकर्णी मॅडम,विभागीय अभियंता बागुल साहेब,वीज वितरण कंपनीचे कोळी,व सर्व ग्रामपंचायत सदस्य,आणि गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .

Spread the love