सध्या बहुतेक जण लहान आणि मोठय़ा खरेदीसाठी पॅशऐवजी यूपीआय पेमेंटचा पर्याय निवडतात. गुगल पे, फोन पे आणि पेटीएमला टक्कर देण्यासाठी अॅपल कंपनी आता स्वतःचे पेमेंट अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामुळे आयफोन युजर्सना आता पेमेंटसाठी दुसऱ्या अॅपवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. अॅपल कंपनी दक्षिण आशियाई बाजारात अॅपल पेमेंट लॉन्च करणार असून यासंदर्भात कंपनी नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबतही महत्त्वाची चर्चा करणार आहे. अॅपल पेमेंटमध्ये फेस आयडेंटिफिकेशनसारखे खास फिचर असेल. या फिचरमुळे युजर्सची गोपनीयता राखली जाईल आणि ते सुरक्षित व्यवहार करू शकतील. याशिवाय अॅपलने हिंदुस्थानच्या बँकिंग प्रणालीमध्ये प्रवेश करण्याची योजना आखली आहे. अॅपल एचडीएफसी बँकेशी संयुक्तपणे क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी चर्चा करीत आहे. पंपनी अॅपल कार्डच्या नावाने क्रेडिट कार्ड लॉन्च करू शकते.