महेंद्र सिंह धोनी नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतो. सध्या त्याचा विमान प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं होताना दिसत आहे. या प्रवासादरम्यान धोनी कँडी क्रश खेळताना दिसत आहे.
त्याचा हा फोटो तुफान व्हायरलं झाला अन् याचा मोठा फायदा कँडी क्रश कंपनीला झाला. ३ तासांत ३० लाखांहून अधिक लोकांनी कँडी क्रश अॅप डाऊन लोड केले.
धोनी हा आपल्या एका कामाच्या निमित्ताने विमानातून प्रवास करत होता. धोनी त्यावेळी नेमका काय करतो आहे, याची उत्सुकता सर्वांनाच होती, विमानातील स्टाफलाही ही गोष्ट पाहायची होती. धोनी आपल्या टॅबवर कँडी क्रश खेळत असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या याचं क्षणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असता, कँडी क्रश ट्रेंड करु लागलं.
त्यानंतर चाहत्यांनी कँडी क्रश खेळण्यास पसंती दर्शवली. कँडी क्रश हा टॉप ट्रेंड बनल्यानंतर, अवघ्या 3 तासांत 3 मिलियनहून अधिक लोकांनी हा गेम डाउनलोड केल्याचा दावा कंपनीने केला आहे. कँडी क्रशनेही धोनीचे आभार मानले की, खेळ ट्रेंड झाला. ‘भारतीय क्रिकेट लीजेंड महेंद्र सिंह धोनी धन्यवाद. तुमच्यामुळेच आम्ही भारतात ट्रेंड करत आहोत.’ अशी भावना कँडी क्रशने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर व्यक्त केली आहे.
https://twitter.com/teams_dream/status/1672944660250238976?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1672944660250238976%7Ctwgr%5E40fa57dd9b43178ab50caed97d48b8f56cfa2e5b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
अन् एअर होस्टेसने दिले चॉकलेट
धोनी विमान प्रवास करताना एक एअर होस्टेस तिथे आली आणि तिने चॉकलेट्सने भरलेली प्लेट धोनीसमोर धरली. या प्लेटमध्ये एक चिठ्ठी पण होती. धोनीने ती चिठ्ठी घेतली आणि त्याने ती वाचली. त्यानंतर धोनीच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
त्यानंतर तुम्ही यामधील अजून चॉकलेट्स घ्या, अशी विनंती एअर होस्टेसने धोनीला केली. त्यानंतर धोनीने मी एक चॉकलेट घेतले आहे आणि माझ्यासाठी सध्या ते पुरेसे आहे, असे धोनीने सांगितल्याचे पाहायला मिळत आहे. धोनीचा आणि या एअर होस्टेसचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.