सुनसगाव – येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर दशमीची दिंडी काढण्यात आली तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी रामप्रहरी काकडा आरती व अभिषेक करण्यात येवून विधीवत पूजन करण्यात आले.यावेळी श्री क्षेत्र कुंडलेश्वर संस्थान बेळी ते पंढरपूर पायी वारी दिंडी सुनसगाव येथील सहभागी झालेले वारकरी किशोर चिंचोरे व सौ सोनाली चिंचोरे यांच्या हस्ते अभिषेक व पूजन करण्यात आले. दुपारी श्रीमद् गीता पारायण श्री वैष्णवी भजनी मंडळाने केले तर संध्याकाळी दिंडी सोहळा काढण्यात येऊन गाव प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी भजनी मंडळीने अभंग व गौळणी वर ठेका धरला. यावेळी गावातील अबालवृद्ध दिंडीत सहभागी झाले होते. रात्री भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.