पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणारी महिला पत्रकार होतेय ट्रोल

0
15

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱयावर असताना त्यांना हिंदुस्थानात अल्पसंख्याकांसोबत होणाऱया भेदभावावर प्रश्न विचारणाऱया वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरिना सिद्दिकी यांना आता सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

व्हाईट हाऊसमध्ये 22 जून रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरीना सिद्दीकींनाही आमंत्रण देण्यात आले होते. सबरीना सिद्दीकी यांनी मोदींना हिंदुस्थानातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण, मुस्लिमांचे हक्क आणि भाषण स्वातंत्र्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर ‘हिंदुस्थानात लोकशाही मूल्यांमध्ये भेदभावाला अजिबात स्थान नाही. जात, वंश किंवा वय किंवा कोणत्याही भौगोलिक स्थानानुसार भेदभाव होत नाही,’ असे उत्तर मोदींनी दिले होते. परंतु, यानंतर सिद्दीकी यांना त्यांचा हेतू आणि त्यांच्या वारशावरून ट्रोल करण्यात येत आहे.

व्हाईट हाऊसकडून निषेध

पत्रकार सबरिना सिद्दीकी यांच्याविरोधातील ऑनलाइन ‘ट्रोलिंग’चा बायडेन प्रशासनाने निषेध केला आहे. ‘आम्ही पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध असून, पत्रकारांच्या छळाचा निषेध करतो,’ असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या करिन जॉन पीअर यांनी म्हटले आहे.

Spread the love