सुनसगाव – येथून जवळच असलेल्या गोजोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आत्माराम गोबा दोडे उर्फ दोडे बाबा यांनी त्यांच्या स्व खर्चाने एस टी महामंडळाची एसटी गोजोरे गावात आणून गोजोरे येथील भाविक भक्तांना पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेले आहे. गावातून एस. टी. पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वी भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवाजी पाटील यांनी श्रीफळ वाढवून एस टी ला रवाना केले या वेळी गावातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोडे बाबा च्या या उपक्रमाने निष्ठावंत व गरजू भाविकांना पांडुरंगाचे दर्शन होणार आहे.