कांग्रेसचे जेष्ठ नेते हाजी रऊफोद्दीन हाजी शफीयोद्दीन यांचे अल्पशः आजाराने निधन

0
13

यावल –  येथील रहिवाशी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी शे.रऊफोद्दीन हाजी शफीयोद्दीन (वय-७२) यांचे दि.१ रोजी रात्री नऊ वाजता अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,तीन मुली,सूना, जावाई ,नातवंडे,पणतू असा परिवार आहे.ते साकळी ग्रा.पं.चे माजी उपसरपंच,यावल कृऊबाचे माजी संचालक तसेच डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्यु.कॉलेजचे सचिव होते. तसेच ते जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अन्वर यांचे वडील तर साकळी येथील अंजुमन- ए- इस्लाम उर्दू हायस्कूलचे उपाध्यक्ष शेख नुरुयोद्दीन हाजी शफीयोद्दीन तसेच एन.एस.केळी गृपचे संचालक शेख न्याजोद्दीन हाजी शफीयोद्दीन यांचे बंधू होत.

Spread the love