सुनसगाव – येथून जवळच असलेल्या नशिराबाद – सुनसगाव रस्त्यावर कोरड्या वाकी नदी जवळ बांधण्यात आलेल्या नविन पुलावर नशिराबाद गावाकडून बाजूला एक मोठा खड्डा पडला होता. या रस्त्यावरुन अनेकदा बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी जात असतात मात्र कोणीही या ठिकाणी लक्ष देत नाही विशेष म्हणजे या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून या पुलावर डांबरीकरण सुध्दा झालेले नाही. एवढा सारा प्रकार असताना कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे गोजोरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रामा कोळी, तानाजी पाटील, सुनसगाव ग्राम सुरक्षा दलाचे जवान प्रविण चौधरी, बाविस्कर बुवा यांनी रस्त्यावर थांबून भर पावसात दगड, माती टाकून जिवघेणा खड्डा बुजला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना अपघात टळणार आहे या कामगीरी मुळे श्रमदान करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.









